Bangladesh defeated Pakistan by 104 runs in the first Test
esakal
Bangladesh beat Pakistan at home for first time in Test cricket: बांगलादेशने मीरपूर कसोटीत पाकिस्तानवर १०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशच्या २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १६३ धावांत तंबूत परतला. बांगलादेशच्या घरच्या मैदानावरील पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच कसोटी विजय ठऱला, तर बांगलादेशचा हा सलग तिसरा कसोटी विजय ठरला. पाकिस्तानला या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Standings) गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.