Bangladesh historic win over Australia in Mirpur
esakal
Josh Inglis and Nahid Rana Exchange Words Video : बांगलादेशने पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. मिरपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात २८४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अपयश आले. या सामन्यात बांगलादेशचा गोलंदाज नाहिद राणा ( Nahid Rana) चमकला, परंतु त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉश इंग्लिस ( Josh Inglis) सोबत घातलेला राडा चर्चेत राहिला. इंग्लिसला अडवण्यासाठी बांगलादेशी खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. बांगलादेशने हा सामना DLS नुसार ८६ धावांनी जिंकला.