Bangladesh qualify for Women’s T20 World Cup 2026
esakal
ICC Women’s T20 World Cup qualifiers update: बांगलादेशच्या पुरुष संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीने कठोर पाऊल उचलले. सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने हा पवित्रा घेतला होता. आयसीसीने त्यांना अंतिम मुदत देऊनही त्यांनी भूमिका बदलली नाही आणि त्यांच्याजागी आयसीसीने स्कॉटलंडचा समावेश करून घेतला. बांगलादेशला दिलेल्या वागणुकीचा मात्र पाकिस्तानला राग आला आणि त्यांनी बहिष्काराची भाषा केली. पाकिस्तानने तसे केल्यास बांगलादेशची पुन्हा एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.