Champions Trophy 2025 Mushfiqur Rahim : बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुशफिकर रहीमने बुधवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुशफिरकरने बांगलादेशचे २७४ वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धची मॅच त्याची शेवटची वन डे मॅच ठरली. त्याआधी भारताविरुद्धच्या लढतीत त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.