
Mohammad Shami SAMT 2024: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सातत्याने चांगली गोलंदाजी करून निवड समितीचे लक्ष वेधत आहे. पण, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी अद्याप त्याला बोलावणं गेलेलं नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शमीने बुधवारी बडोदा संघाविरुद्ध २ विकेट्स घेऊन मोठा विक्रम नोंदवला. त्यामुळे आता तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शमीला बोलवा अशी मागणी होतेय...