BBL 2026-27 opening match Chennai
esakal
Big Bash League opener in Chennai: क्रिकेट इतिहासात प्रथमच बिग बॅश लीगची सुरुवात भारतातून होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची घोषणा केली आहे. BBL 2026/27 चे वेळापत्रक जाहीर करताना पर्थ स्कॉचर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातला सलामीचा सामना हा चेन्नईच्या चेपॉकवर होणार आहे. १२ डिसेंबरपासून बीबीएलच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार आहे आणि हा सामना भारतीयवेळेप्रमाणे दुपारी २:४० मिनिटाला सुरू होणार आहे.