
BCCI Announce Cash Prize For Team India : नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेत भारतीय संघाने घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेमधील एकही सामना न गमावत भारताने विजेतेपद पटकावले. ३ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ पहिला संघ बनला आहे. भारतीय संघाच्या या विक्रमी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून टीम इंडियासाठी ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
ही आर्थिक मान्यता खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी आणि पुरुष निवड समितीच्या सदस्य या सर्वांच्या सन्मानार्थ देण्यात येत आहे. या ५८ कोटींपैकी ३ कोटी प्रत्येक खेळाडूला मिळणार आहे. ३ कोटी मुख्य प्रशिक्षकाना, तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५७ लाख रूपये मिळणार आहेत.