Cricket
BCCI ने जाहीर केले सुधारित संघ; Shubman Gill, लोकेश राहुलला केलं रिलीज, Rinku Singh ची एन्ट्री
Duleep Trophy 2024-25 : भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १२ तारखेला चेन्नईत दाखल होणार आहे. त्याआधी BCCI ने आज पुन्हा मोठी घोषणा केली.
Updated Squads for second round of DuleepTrophy 2024-25 -
बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी २०२४-२५ च्या दुसऱ्या फेरीसाठी आज संघ जाहीर केले. अनंतपूर येथे १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुरुष निवड समितीने संघांमध्ये काही बदल जाहीर केले आहेत.
मयांक अग्रवालकडे कर्णधारपद
भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिल, लोकेश राहुल ( KL Rahul), ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाश दीप यांना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे आणि त्यामुळे ते दुलीप ट्रॉफीच्या आगामी फेरीत खेळणार नाहीत. निवडकर्त्यांनी Shubman Gillच्या जागी प्रथम सिंग, राहुलच्या जागी अक्षय वाडकर आणि जुरेलच्या जागी एसके रशीद यांची निवड केली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज शॅम्स मुलानी कुलदीपच्या जागी संघात, तर आकिब खान आकाशदीपच्या जागी संघात दिसेल. मयांक अग्रवालची भारताचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.