

Total matches in BCCI domestic season 2026-27: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२६-२७ च्या भारतीय देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. या हंगामात पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्व वयोगट आणि फॉरमॅटमध्ये एकूण १७८८ सामने खेळवले जातील. या हंगामात पुरुष क्रिकेटमध्ये वरिष्ठ, २३ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील गटांमध्ये स्पर्धांचा समावेश आहे. तसेच महिलांच्या वरिष्ठ, २३ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील स्पर्धांचेही वेळापत्रक आहे.