
BCCI announces annual player retainership 2024-25 for Indian Womens Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ हंगामासाठी करारबद्ध केलेल्या महिला क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. हा करार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी मर्यादित असणार आहे. एकूण १६ खेळाडूंना भारताच्या प्रमुख महिला संघाचा करार मिळाला आहे. ज्यामध्ये एकूण ३ खेळाडूंना 'अ' श्रेणी, ४ खेळाडूंना 'ब' श्रेणी आणि एकूण ९ खेळाडूंना 'क' श्रेणीचा करार मिळाला आहे.