भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) गुरुवारी टीम इंडियाच्या आगामी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ, ऑस्ट्रेलिया अ व दक्षिण आफ्रिका अ असे पुरुष संघ सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि एकूण १३ सामने खेळणार आहेत. या मालिका भारताच्या अ संघासाठी खूप महत्त्वाची अन् फायद्याची असणार आहे.