Why did Virat Kohli retire from Test cricket suddenly? भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. १२ मे २०२५ रोजी विराटने इंस्टाग्रामवर त्याच्या भावना व्यक्त करताना ही निवृत्ती जाहीर केली. २०१४ मध्ये विराटकडे कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद आलं आणि २०२२ पर्यंत त्याने ६८ सामन्यांत देशाचे नेतृत्व सांभाळताना ४० विजय मिळवले. भारतीय कर्णधाराने कसोटीत मिळवलेले हे सर्वाधिक विजय आहेत. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत विराटचा समावेश अपेक्षित होता, परंतु त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याच्या अचानक निवृत्तीमुळे बरेच प्रश्न उपस्थित राहत आहेत.