भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) मागील महिन्यात वार्षिक करार जाहीर केले आणि त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांना A+ ग्रेडमध्ये ठेवले होते. जे खेळाडू भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळतात त्यांना या ग्रेडमध्ये करार दिला जातो. पण, रोहित शर्मा व विराट कोहली यांनी मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून, तर काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे ते आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहे. अशात या दोघांचा A+ ग्रेड कायम राहणार आहे का? यावर BCCI ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.