Ravi Shastri Blames BCCI for Not Making Virat Kohli Test Captain Again
विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेऊन आता एक महिना झाला आहे. रोहित शर्मानंतर विराटने कसोटीतून घेतलेली निवृत्ती सर्वांना धक्का देणारी होती. विराटने किमान इंग्लंड दौऱ्यावर खेळायला हवं होतं, असं अनेकांचं मतही होतं. पण, बीसीसीआय आणि निवड समिती यांनी त्याच्यासोबत चर्चा करण्यात दिरंगाई केली आणि विराटने निवृत्ती जाहीर केली, असा कयास बांधला जातोय. भारत-इंग्लंड मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, जे विराटचे चांगले मित्रही आहेत, त्यांनी विराटने इंग्लंड दौऱ्यावर असायला हवं होतं असे मत व्यक्त केले आहे.