IPL 2027 likely window March 10 to May 15
esakal
BCCI no plans to expand IPL to 94 matches: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. आयपीएलच्या पुढील पर्वात सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ करण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती, परंतु त्यांनाही पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया ( Devajit Saikia ) यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी आयपीएल १० मार्च ते १५ मे या कालावधीत खेळवण्याचा विचार सुरू आहे. देशातील अनेक भागांमध्ये मे महिन्यात तीव्र उष्णता जाणवत असल्याने स्पर्धा लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.