
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मागील महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृ्त्ती जाहीर केली होती. त्यामुळे तो आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहे. पण, बीसीसीआयला हे अपेक्षित नव्हतं. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार रोहित वन डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेईल, असे बीसीसीआयला अपेक्षित होते. निवड समिती प्रमुख अजित आगरकरने २५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियाच्या वन डे संघाचा कर्णधार बनवण्याची तयारीही केली होती. पण...