Dream 11 चा गेमओवर! BCCI चे स्पॉन्सर्स कायम गोत्यात का येतात? जाणून घ्या इतिहास
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नव्या ऑनलाइन गेमिंग कायद्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
ड्रीम11 आणि माय11सर्कल यांचे प्रायोजकत्व धोक्यात आले असून, बीसीसीआयला नव्या प्रायोजकांच्या शोधात जावे लागेल.
या कायद्यामुळे बीसीसीआयच्या उत्पन्नावर आणि भारतीय क्रिकेटच्या भवितव्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
Online Gaming Bill : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकतेच पास केलेले "प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल 2025" ऑनलाइन गेमिंग उद्योगावर कडक निर्बंध घालणारे आहे. यामुळे बीसीसीआयचे प्रमुख प्रायोजक ड्रीम11 आणि माय11सर्कल यांचे प्रायोजकत्व धोक्यात आले आहे. या कायद्यामुळे पैशांवर आधारित ऑनलाइन गेमिंगवर पूर्णपणे बंदी येण्याची शक्यता आहे ज्याचा थेट परिणाम बीसीसीआयच्या उत्पन्नावर होऊ शकतो.