Rohit Sharma hamstring injury recovery news
esakal
Latest Rohit Sharma injury update before Afghanistan series: आयपीएल २०२६ गाजवणाऱ्या विराट कोहलीच्या माघारीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेची उत्सुकता काहीशी कमी झालेली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे, पंरतु त्यात विराट नाही.. अशात रोहित शर्माच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह होता, कारण IPL 2026 दरम्यान त्याला हॅमस्ट्रींग दुखापतीने त्रास दिला होता. त्यामुळेच तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होता. मात्र, हाती आलेल्या अपडेट्सनुसार रोहित पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि तो या मालिकेत खेळणार आहे.