From Sacked To Rehired: T Dilip Returns Ahead Of England Tour : भारतीय कसोटी संघाची नवी सुरुवात इंग्लंड दौऱ्यावरून होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन हे सीनियर खेळाडू निवृत्त झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणारा संघ हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा संघ असणार आहे. शुभमन गिल हा कसोटी संघाचा नवा कर्णधार असला तरी रिमोट कंट्रोल हे गौतमच्याच हाती असेल, यात काही शंका नाही. संघ निवडीत आपला काहीच हात नसल्याचे जरी मुख्य प्रशिक्षक चॅनेलवर सांगत असला तरी त्याचा प्रभाव हा दिसतो. गौतम टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर त्याने सर्वात आधी सपोर्ट स्टाफमध्ये आपली माणसं घुसवली. मागच्या महिन्यात बीसीसीआयने राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याची हकालपट्टी केली, पण त्यांना आता त्याच्याच हातापाया पडावे लागत आहेत.