Career opportunities in BCCI coaching staff : भारतीय खेळाडूंसोबत काम करण्याची संधी चालून आली आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने तशी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. बंगळुरू येथील अत्याधुनिक बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) येथे स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. भारताच्या स्पिन गोलंदाजी प्रतिभेच्या विकासासाठी आणि सर्व प्रकारच्या व वयोगटातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी BCCIला फिरकी प्रशिक्षक हवा आहे. भारताचे वरिष्ठ संघ (पुरुष आणि महिला), भारत अ, २३ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, १६ व १५ वर्षांखालील संघ तसेच बीसीसीआय सीओई येथे प्रशिक्षण घेणारे राज्य संघटनांचे खेळाडू यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या प्रशिक्षकाला पार पाडावी लागेल.