Team India : BCCI खेळणार मोठा डाव, IPL दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू जाणार अमेरिकेला, काय आहे कारण?

T20 World Cup 2024 BCCI Special Plan Team India : यंदा टी-20 वर्ल्ड कपचा थरार 1 जूनपासून यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे.
T20 World Cup 2024 BCCI Special Plan Team India marathi news
T20 World Cup 2024 BCCI Special Plan Team India marathi newssakal

T20 World Cup 2024 : यंदा टी-20 वर्ल्ड कपचा थरार 1 जूनपासून यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएल 22 मार्चपासून सुरू होऊ शकते, तर मेच्या शेवटच्या आठवड्यात संपू शकते. यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.

आता बीसीसीआयने याबाबत स्वतःची खास योजना बनवली आहे. आयपीएलच्या मध्यभागी बोर्ड खेळाडूंना तयारीसाठी न्यूयॉर्क (यूएसए) येथे पाठवणार असल्याचे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. यासाठी जे खेळाडू वर्ल्ड कप खेळणार आहेत ते अमेरिकेला रवाना होतील.

T20 World Cup 2024 BCCI Special Plan Team India marathi news
Ind vs Eng : टीम इंडियात होणार मोठे बदल; दोघांचे पदार्पण, यष्टिरक्षकाचा पत्ता कट, त्रिशतक ठोकणाऱ्याची Playing 11 मध्ये एन्ट्री?

बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय खेळाडूंना आधी न्यूयॉर्कला पाठवू शकते, असे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. यासाठी, ज्या खेळाडूंचे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाहीत ते आयपीएल प्ले-ऑफ दरम्यान यूएसएला जातील. टीम इंडिया 5 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल आणि पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळेल.

T20 World Cup 2024 BCCI Special Plan Team India marathi news
Ind vs Eng : टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी बातमी; जसप्रीत बुमराह राजकोटमध्ये गायब? खेळण्यावर प्रश्नचिन्ह

ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून त्यासाठी सर्व 20 संघांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांची स्क्वॉडची घोषणा करावी लागणार आहेत. त्यानंतर 20-22 मे पर्यंत संघ त्यांच्या संघात अंतिम बदल करू शकतील.

यानंतर जे काही बदल घडतील, त्यासाठी आयसीसीकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल. आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु स्पर्धेच्या मध्यभागी पहिल्या टप्प्यानंतर वर्ल्ड कपचा संघ जाहीर केला जाईल हे निश्चित आहे.

भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए ग्रुप ए मध्ये आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत असून सर्व 5-5 गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात 4-4 सामने खेळावे लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com