Asia Cup 2025: भारत आशिया चषकावर 'बॉयकॉट'च्या तयारीत? पाकिस्तानच्या मोहसिन नक्वींकडून BCCI वर अनावश्यक दबाव

Asia Cup 2025 Tensions Rise: आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या आयोजनावरून भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध पुन्हा तणावात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोसिन नक्वी हे बीसीसीआयवर दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे.
India-Pakistan Asia Cup 2025 dispute heats up amid boycott speculations
India-Pakistan Asia Cup 2025 dispute heats up amid boycott speculationsesakal
Updated on

थोडक्यात महत्त्वाचे

  • आशिया चषक २०२५ स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट

  • २४ जुलैला ढाक्यात होणाऱ्या बैठकीवर बीसीसीआयचा बहिष्कार

  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांक़डून भारतावर दबाव

आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठीची बैठक ढाका येथे बोलावण्यात आली आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) त्याला विरोध केला आणि हे ठिकाण न बदलल्यास स्पर्धेवरच बहिष्कार टाकण्याची शक्यता बळावली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची ( ACC) वार्षिक सर्वसाधारण सभा ( AGM) २४ जुलैला ढाका येते होणार होता. या सभेत आशिया चषक स्पर्धेच्या भवितव्याबाबत चर्चा केली जाणार आहे. या स्पर्धेत सहा संघ खेळणार असून यंदा ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये चुरस रंगणार आहे. पण, या स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com