India A women’s multi-format series in Australia details : भारतीय महिलांचा अ संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी घोषित झालेल्या संघाची कर्णधार म्हणून राधा यादवची निवड करण्यात आली आहे. राधा यादवने नुकतीच भारतृीय संघाकडून १०० वी ट्वेंटी-२० मॅच खेळली आणि तीची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दौऱ्यासाठी भारत अ महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आली आहे. केरळची मिन्नू मणी आता उपकर्णधार असेल, गेल्या वेळी तिने संघाचे नेतृत्व केले होते.