
BCCI New Rulebook: भारतीय संघाने २०२४ मधील शेवटच्या दोन हंगामात खराब कामगिरी केली. दोन्हीही मालिका भारताला गमवाव्या लागल्या. त्यानंतर नवीन वर्ष सुरू होताच BCCI ने भारतीय खेळाडूंसाठी काही बंधने घातली आहेत. मागच्या २ महिन्यात भारतीय संघात जो गोंधळ सुरू आहे. त्यामुळे भारतीय नियामक मंडळाच्या बैठकीत या निर्बंध ठरवण्यात आले असल्याचे कळत आहे. BCCI ने खेळाडूंसाठी केकेल्या नियमावलीची यादी आता समोर आली आहे. ज्यामध्ये खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तीचे केले आहे, त्याचसोबत मालिकेदम्यान कुटुंसोबत राहाण्याल प्रतिबंध घालण्यात आला आहे आणि आणखी काही नियम BCCI ने खेळांडूसाठी घालून दिले आहेत.