
New Batting Coach: भारतीय संघाचा मागच्या दोन कसोटी सामन्यात दारून पराभव झाला. त्याआधी श्रीलंकेविरूद्धची वन-डे मालिका भारताला गमवावी लागली होती. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पराभवानंतर क्रिकेटपटूंसोबतच भारतीय कोचिंग स्टाफच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर आता नवीन बातमी समोर येत आली, बीसीसीआय नवीन फलंदाजी प्रशिक्षकाच्या शोधात असल्याचे समजले. त्यानंतर इंग्लिश क्रिकेटपटू केविन पिटरसनचे नाव समोर आले. पण आता आणखी एक नाव समोर येत आहे. एकही सामना न खेळलेल्या प्रशिक्षकाला बीसीसीआय करारबद्ध करणार असल्याचे समजत आहे.