BCCI plans to rope in VVS Laxman to help India prepare better for Tests
esakal
BCCI plans to use VVS Laxman for India Test preparation: गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिकांमध्ये व्हाईटवॉश पत्करावा लागला. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC Final 2027) फायनल गाठण्याचे भारताचे स्वप्न धुसर झाले आहे. भारतीय संघाचे सर्व लक्ष आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२७च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेकडे आहे. अशात कसोटी क्रिकेटमधील घसरलेला दर्जा सुधारण्यासाठी BCCI ने गौतम गंभीरचे पंख छाटण्यास सुरूवात करण्याची हालचाल सुरू केली आहे. भारतीय कसोटी संघाची तयारी करून घेण्यासाठी बीसीसीआय आता माजी दिग्गजाची मदत घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.