
Rohit Sharma asks BCCI to appoint a new captain: गौतम गंभीर याने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर टीम इंडियाला काही चांगले निकाल देता आलेले नाहीत. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत पराभव, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रथमच मायदेशात ०-३ असा क्लीन स्वीप आणि १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत हार... यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी काल मुंबईत बैठक पार पडली. या आढावा बैठकीत BCCIच्या अधिकाऱ्यांनी कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना प्रश्न विचारले. या बैठकीत रोहितने BCCI ला आता नव्या कर्णधाराचा शोध सुरू करा, असे स्पष्ट सांगितल्याचे वृत्त आहे.