no victory parade yet for Team India’s World Cup-winning women’s squad.
esakal
Devajit Saikia statement on Team India’s victory parade: भारतीय महिला संघाने रविवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून हरमनप्रीत कौरच्या संघाने वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण केले. भारताच्या ७ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४५.३ षटकांत २४६ धावांवर ऑल आऊट झाला. दीप्ती शर्मा व शफाली वर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला. आता भारतीय संघाची विजयी मिरवणुक केव्हा व कुठे, याची उत्सुकता आहे.