Virat Kohli remains in BCCI’s 2027 ODI World Cup plans despite retirement speculation.
esakal
Virat Kohli London training for 2027 World Cup : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने काल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आणि त्यात त्याने जोपर्यंत तुम्ही हार पत्करत नाही, तोपर्यंत तुम्ही पराभूत झालेले नसता... अशी पोस्ट लिहिली. त्यावरून बरीच चर्चा रंगली आणि विराट २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी किती उत्सुक आहे, हे स्पष्ट झाले. पण, त्यानंतर ही पोस्ट त्याने व्यावसायिक जाहिरातीसाठी केल्याचे स्पष्ट झाले. पण, या मधल्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) सूत्र फिरवली आणि दोन वर्षानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये विराटच्या समावेशाबाबत मोठे अपडेट्स समोर आले.