भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) स्पोर्ट्स सायन्स विभागाचे प्रमुख नितीन पटेल ( Nitin Patel) यांनी राजीनामा टाकला आहे आणि सध्या ते नोटिस कालावधीत आहेत. पटेल हे भारतीय संघाचे आणि मुंबई इंडियन्सचे फिजिओ म्हणून पूर्वी काम करत होते. त्यांच्या राजीनाम्याने बीसीसीआयसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे आणि ते या पदासाठी लवकरच नवीन व्यक्तीच्या शोधात आहेत.