Manoj Tiwary statement on Rohit Sharma captaincy
esakal
BCCI decision on Shubman Gill captaincy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रोहित शर्माच्या जागी वन डे संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल याची निवड केली. बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक मतमतांतर आजही आहेत. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत बोर्डाला ४० वर्षीय रोहित कर्णधार नकोय. हा निर्णय अनेकांना पटला, परंतु अजूनही तो पचवणे काहींना जड जातंय. वय हा फॅक्टर असला तरी रोहित चांगला खेळतोय, असे त्यांचे म्हणणे आहे.