

VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
Why Has Vaibhav Sooryavanshi Not Made His India Debut Yet?: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मात्र, या मालिकेपेक्षाही जास्त चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची. यंदाच्या वर्षात वैभवने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आयपीएल २०२६ मध्ये त्याने शानदार कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. त्याचबरोबर अनेक वैयक्तिक पुरस्कारही त्याने पटकावले. भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या तिरंगी मालिकेतही वैभवने अवघ्या २९ चेंडूत ९४ धावांची तुफानी खेळी करत आपली प्रतिभा सिद्ध केली.