बीसीसीआयने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ९,७४१.७ कोटी रुपये महसूल मिळवला
या कमावलेल्या एकूण महसुलापैकी ५९ टक्के वाटा एकट्या आयपीएलचा होता
बोर्ड व्याजातून वर्षाला सुमारे १,००० कोटी रुपये कमवतात
BCCI financial report shows massive earnings from IPL : इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी ( BCCI) सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आयपीएलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत पैसाच पैसा येत आहे. एका अहवालानुसार, बीसीसीआयने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कमावलेल्या एकूण महसुलापैकी ५९ टक्के वाटा एकट्या आयपीएलचा होता.