

No A+ Category BCCI May Pay Bumrah ₹2 Crore After Contract Shake-Up
esakal
BCCI central contract changes 2025-26 explained: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) २०२५-२६ साठी वार्षिक करार नुकतेच जाहीर केले. त्यात त्यांनी A+ ही श्रेणीच काढून टाकली आणि त्यात अव्वल खेळाडूंचे A श्रेणीत डिमोशन केले. रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन दिग्गज आता फक्त वन डे क्रिकेट खेळत असल्याने बीसीसीआयने A+ श्रेणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या श्रेणीत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले जाते. पण, रोहित व विराट यांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटीतील निवृत्तीमुळे A+ श्रेणी रद्दबाद केल्यामुळे जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) A श्रेणीत टाकण्यात आले आणि याचा परिणाम त्याच्या पगारावर झाला.