
भारतीय क्रिकेट संघाला मागील दोन कसोटी मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघ न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर आता बीसीसीआयकडून आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सजगतेचे पाऊल उचलण्यात येणार आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेचा सराव आयपीएलमध्येच करण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे. अशाप्रकारचे वृत्त समोर आले आहे.