
India's World Test Championship schedule 2025-27:
आर अश्विनच्या अचानक निवृत्तीने भारतीय संघात आगामी काळात स्थित्यंतरं पाहायला मिळतील, हे संकेत मिळाले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग तिसरी फायनल खेळायची आहे आणि यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ती जिंकायची आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांचे वय पाहता त्यांचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दुष्काळाप्रमाणे WTC चा दुष्काळ संपवण्याचा रोहितचा निर्धार आहे. त्यामागे आणखी एक कारणही आहे. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पुढील मालिका २० जूनला खेळायची आहे. तोपर्यंत सध्याच्या संघातील विशेष करून रोहित व विराट यांच्यासह आणखी काही खेळाडू निवृत्त घेऊ शकतील. त्यामुळे WTC 2025-27 च्या सर्कलमध्ये भारताचा नव्या दमाचा संघ दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.