भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका जिंकली
हरमनप्रीत कौरने दाखवलेले नेतृत्वगुण सर्वांच्या मनाला भिडले.
शानदार शतक झळकावून 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावणाऱ्या हरमनप्रीतने हा पुरस्कार क्रांती गौड हिच्यासोबत शेअर केला
Harmanpreet Kaur shares POTM award with Kranti Goud : भारतीय महिला संघाने ट्वेंटी-२० मालिकेनंतर वन डे मालिकेतही यजमान इंग्लंडला पराभूत केले. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली. इंग्लंडमध्ये भारतीय महिलांची तिसऱ्यांदा वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. हरमनप्रीत कौरचे शतक आणि क्रांती गौडच्या ( Kranti Goud) सहा विकेट्समुळे भारताने हा विजय मिळवला. पण, या सामन्यानतंर कर्णधार हरमनप्रीतच्या कृतीने जिंकले मन.