Mohammed Shami : पृथ्वी शॉचा त्रिफळा अन्... मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर महाराष्ट्राचा डाव गडगडला; टीम इंडियाच्या निवड समितीला गोलंदाजाचा इशारा

Bengal vs Maharashtra Ranji Trophy 2026-27 match: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत आपल्या भेदक गोलंदाजीची झलक दाखवली आहे. बंगालकडून खेळताना शमीने महाराष्ट्राच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले.
Bengal vs Maharashtra Ranji Trophy 2026-27 match

Bengal vs Maharashtra Ranji Trophy 2026-27 match

esakal

Updated on: 

Mohammed Shami three wickets against Maharashtra in Ranji Trophy: भुवनेश्वर कुमारचे चार वर्षानंतर टीम इंडियात पुनरागमन झाले, परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करणारा मोहम्मद शमी, एक वर्षापासून संघ व्यवस्थापनाच्या हाक ऐकण्यासाठी आतुरलेला आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर शमी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला तो गेलाच... त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून आपला फॉर्म व फिटनेस सिद्ध केले, तरीही त्याची निवड झाली नाही. पण, त्याने जिद्द सोडलेली नाही आणि रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या फलंदाजांना शमीच्या धारधार आक्रमणाचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...