
India vs Australia Test Series : Australia, We Have Arrived... असे आव्हान टीम इंडियाने यजमानांना दिले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. भारताचा संघ दोन तुकड्यांमध्ये ऑस्ट्रेलियात दाखल झाला आणि पर्थ येथील कसोटीसाठी कसून सरावालाही लागला. विराट कोहली ( Virat kohli) थोडा उशीराने संघात जॉईन झाला, परंतु त्याच्या येण्याने वातावरण एकदम उर्जात्मक झालेले दिसले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने बाऊन्सरचा मारा करून भारतीय फलंदाजांना भांभावून सोडले. मोहम्मद सिराज, आकाश दीप, आर अश्विन यांनीही नेट्समध्ये गोलंदाजी केली.