भुवनेश्वर कुमारची टीम इंडियात वापसी कशी झाली? Ajit Agarkar च्या जाण्याने खुला झाला मार्ग, कोणी भाकरी फिरवली?

Ajit Agarkar exit and Bhuvneshwar Kumar India comeback: निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा परतीचा मार्ग अडवला होता. पण, आगरकर जाताच भुवीचे भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले.
Ajit Agarkar exit and Bhuvneshwar Kumar India comeback

Ajit Agarkar exit and Bhuvneshwar Kumar India comeback

esakal

Updated on: 

How Bhuvneshwar Kumar returned to Team India T20I squad? इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारचे अखेर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले. न्यूझीलंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघ जाहीर केला गेला. या संघात भुवीचे नाव पाहताच चाहत्यांना आनंद झाला. पण, निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) याचे जाणे आणि भुवीचे संघात परतणे, या योगायोगाने सर्वांना अचंबित केले आहे. मात्र, हा योगायोग नाही. आगरकरनेच भुवीच्या परतीची वाट रोखली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com