
Bhuvneshwar Kumar maiden T20 hat-trick : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी नुकत्याच पार पडलेल्या लिलावात १०.७५ कोटी रुपयांची बोली लागलेल्या भुवनेश्वर कुमारने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक नोंदवली. IPL 2025 मध्ये भुवी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणार आहे. उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार भुवनेश्वरने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत झारखंडविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली. ट्वेंटी-२०तील ही त्याची पहिलीच हॅटट्रिक होती. SMAT च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना उत्तर प्रदेश संघाला जिंकणे महत्त्वाचे होते.