Bhuvneshwar Kumar to lead India at Hong Kong Sixes
India's Hong Kong Sixes Squad Announced: २०२२ पासून भारतीय संघाबाहेर असणारा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) हा पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या भुवीला भारतीय संघात खेळवण्याची मागणी जोर धरत होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय गोलंदाजांची धुलाई पाहिल्यानंतर तर भुवी व मोहम्मद शमी यांना संघात घ्या, यासाठी जोर वाढला आहे. अशात भुवनेश्वर पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसेल, ही बातमी समोर आली आहे. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात भुवनेश्वरला संधी मिळाली आहे.