BHUVNESHWAR KUMAR: सिलेक्टर्सचा फक्त एक फोन अन् भुवी पुन्हा टीम इंडियात! दमदार IPL सीझननंतर भुवनेश्वरचा खुलासा; म्हणाला, ‘मी नकार...

Bhuvneshwar Kumar ready for Team India comeback after IPL 2026: आयपीएल २०२६ मधील दमदार कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारच्या टीम इंडियातील कमबॅकची चर्चा सुरू झाली आहे. भारताकडून खेळण्याची संधी मिळाली तर आपण नकार देणार नाही, असे भुवीने स्पष्ट केले आहे.
BHUVNESHWAR KUMAR

BHUVNESHWAR KUMAR

esakal

Updated on

Bhuvneshwar Kumar ready for Team India comeback after IPL 2026: भारतीय संघापासून अनेक वर्षे बाहेर असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची भारतीय संघात परतण्याची शक्यता सध्या कमी आहे. पण निवड समितीने त्याला पुन्हा संघात येण्यासाठी बोलावलं, तर त्याचं उत्तर काय असेल, याबाबत आता भुवीने आपलं मत व्यक्त केलं आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीने जबरदस्त कामगिरी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

परंतु अनेक वर्षांपासून भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला असता, भुवीने अगदी स्पष्ट उत्तर दिलं आहे. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com