IND vs NZ 1st ODI: उद्या पहिला वन डे सामना अन् एक, दोन नव्हे, तर सहा खेळाडूंची माघार; दुखापतीच्या ग्रहणाने संघ अडचणीत, भारत...

IND vs NZ 1st ODI New Zealand injury update: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वन डे सामना उद्या खेळवला जाणार असून, त्याआधीच न्यूझीलंडच्या संघाला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा खेळाडू पहिल्या वन डे सामन्यात किंवा संपूर्ण मालिकेतून बाहेर झाले आहेत.
India vs New Zealand ODI

New Zealand face a major injury crisis ahead of the India ODI series, with six players ruled out and Matt Henry doubtful for the opening match

esakal

Updated on: 

New Zealand six players ruled out ahead of India 1st ODI: न्यूझीलंड संघाला घरच्या मैदानावर ट्वेंटी-२० मालिकेत अपयशाचा सामना करावा लागला. भारताविरुद्ध त्याने शेवटच्या दोन ट्वेंटी-२० लढती जिंकून आत्मविश्वास कमावला असला तरी वन डे मालिकेत भारताचा सामना करणे त्यांना सोपे नक्कीच नसेल... रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन दिग्गज संघात असलेल्या भारताची बाजू भक्कम आहे. त्यात न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला आहे. बुधवारी होणाऱ्या पहिल्या वन डे पूर्वी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) याला माघार घ्यावी लागली. तो पहिल्या वन डे मध्ये खेळणार नसला तरी IND vs NZ वन डे मालिकेतून माघार घेणारा तो सहावा किवी खेळाडू आहे.

Loading content, please wait...