Tilak Varma abdomen injury update before New Zealand series
esakal
India vs New Zealand: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज होत असताना यजमानांना मोठा धक्का बसला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये नायक ठरलेला आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा ( Tilak Verma Injury) हा पोटाच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून तो बाहेर पडू शकतो. २१ जानेवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारत पर्यायी खेळाडू निवडण्याचा विचार करत आहे. पण, याजागी भारताचा कसोटी आणि वन डे कर्णधार शुभमन गिलचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे.