रिषभ पंतच्या पायाला चौथ्या कसोटीत दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
वैद्यकीय अहवालानुसार त्याला पूर्ण सावरायला किमान सहा आठवडे लागतील.
आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी तो अनुपलब्ध राहील, हे जवळपास निश्चित आहे.
Rishabh Pant injury update today: यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पं याला भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यातील पहिल्या दिवशी पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चेंडू रिषभच्या पायावर आदळला आणि त्यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्या. त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे तो केव्हा पुनरागमन करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.