Bhuvneshwar Kumar
Arshdeep Singh replaced by Bhuvneshwar Kumar for 5th T20I: भारतीय संघाने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी संघात बदल केला आहे. जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याने दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून माघार घेतल्याची घोषणा BCCI ने सुरुवातीला केली होती. पण, त्यांनी त्यांची चूक दुरुस्त करताना अर्शदीपला केवळ दुखापत झाल्याचे जाहीर केले. पण, त्यांनी भुवनेश्वर कुमारला संघात संधी दिली आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या ट्वेंटी-२० संघात भुवीचा आधीच समावेश करण्यात आला आहे. तो जवळपास ४ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करतोय. तो भारतासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्येच अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता.