
VIRAT KOHLI MAY REVERSE TEST RETIREMENT : रोहित शर्मानंतर विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ( BCCI) निवृत्तीचा बॉम्ब टाकला आहे. विराटने यापुढे कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नसल्याचे बीसीसीआयला कळवल्याचे वृत्त आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने सकाळी दिले आणि त्यानंतर गोंधळ उडाला आहे. विराटने त्याच्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती बीसीसीआयला वाटत आहे. पण, विराट ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे पाहून बीसीसीआयने आता वेगळी खेळी खेळली आहे. विराटच्या मनधरणीसाठी भारतीय क्रिकेटमधील मोठी व प्रभावशाली व्यक्ती बीसीसीआयने मैदानावर उतरवली आहे.