Impact of Rohit Sharma's surgery on India's ODI plans भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ नंतर हॅमस्ट्रिंगवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. रोहितने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि मागच्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० फॉरमॅटमधूनही निवृत्त झाला होता. आता त्याचे संपूर्ण लक्ष २०२७च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर आहे, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्याला पूर्वीसारखं खेळता येणार का? आणि भारताच्या वन डे क्रिकेटच्या वाटचालीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? ही प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.