बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाची झालेली लाजीरवाणी कामगिरी काही केल्या विसरता येत नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी जिंकली आणि त्यानंतर रोहित शर्मा आला अन् एकामागून एक मॅच आपण गमवल्या. सिडनी येथे झालेल्या पाचव्या कसोटीत कॅप्टन रोहितने स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले अन् शुभमन गिलला ( Shubman Gill) संधी दिली गेली. रोहितच्या या निर्णयाला त्याच्या निवृत्तीचे संकेत असल्याचे म्हटले गेले, परंतु रोहितने अफवांचा हा चेंडू पूलशॉटने सीमापार पाठवून दिला. पण, आज ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याला दिलेल्या मुलाखतीत रोहित त्या निर्णयावर व्यक्त झाला.